महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावरील सन २०२२ चा बॅंको ब्ल्यु रिबन पुरस्कार जाहीर


- पुरस्काराचे वितरण २८ फेब्रुवारी २०२३ ला महाबळेश्वर येथे होणार 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी /  गडचिरोली : देशातील सहकार क्षेत्राला बळकटी आणणाऱ्या जिल्हा सहकारी बँका व नागरी सहकारी बैंका यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे या हेतुने दरवर्षी बँको ब्ल्यु रिबन पुरस्कार देण्यात येतो. ३१ मार्च २०२२ च्या आर्थीक स्थितीवर ठेव वृध्दी श्रेणीतील बँको ब्ल्यु रिबन राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पुरस्कार गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सलग सातव्या वर्षी जाहीर झालेला आहे. सदर पुरस्काराचे वितरण २८ फेब्रुवारी २०२३ ला महाबळेश्वर येथे होणार आहे.


देशातील ३७० बँकांमधुन निवड : सलग सातव्या वर्षी पुरस्कार जाहीर

देशातील ३७० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या श्रेणीत ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या आर्थीक वर्ष सन २०२१-२२ या वर्षात रु. २ हजार ते रु. ५ हजार कोटींच्या ठेवी असलेल्या श्रेणीमध्ये गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ठेव वृध्दी तसेच रिजर्व्ह बँक व नाबार्डच्या आर्थीक निकषानुसार बँकेचे एन.पी.ए. चे प्रमाण, सी.आर.ए.आर. आदी निकषात बँक पात्र झालेली असुन, ३१ मार्च २०२२ च्या आर्थीक स्थितीवर बँकेचे ग्रॉस एन.पी.ए. १.०५ टक्के आहे. बँकेने आर्थीक निकषात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बँको समितीने राष्ट्रीय स्तरावरचा सन २०२२ या वर्षाचा बँको ब्ल्यु रिबन पुरस्कार जाहीर केलेला आहे. यापुर्वी बँकींग फ्रंटीअर्स तर्फे सन २०१७-१८ या वर्षाचा उत्कृष्ट माहिती तंत्रज्ञानाचा प्रथम पुरस्कार व सन २०१६ ते २०२१ पर्यंत बँकेला सलग ६ वर्षे बँको ब्ल्यु रिबन पुरस्काराने बँकेला सन्मानीत करण्यात आलेले आहे. बँकेला नुकताच सन २०२१-२२ या वर्षात वित्तीय समावेशन कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नाबार्ड कडुन राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले आहे.

गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेने ५५ शाखा व ३५ ए.टी.एम. च्या माध्यमातुन जिल्ह्यातील ग्राहकांना अत्याधुनीक बँकींग सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. बँकेने ३१ मार्च २०२२ च्या आर्थीक स्थितीवर रु. ३ हजार कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार केलेला आहे. सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जिल्ह्यातील शेतकरी वर्ग, ठेवीदार, पगारदार कर्मचारी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, महिला बचत गटांचे सदस्य व हितचिंतक तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांचे वेळोवेळी मिळत असलेल्या सहकार्यामुळे बँकेला सन २०२२ चा बँको ब्ल्यु रिबन पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. याबाबत बँकेचे अध्यक्ष प्रंचित अरविंद पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी, मानद सचिव अनंत साळवे, बँकेचे संचालक व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीष आयलवार यांनी आभार मानले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos