पेरमिली येथे महाआॅनलाईन सेवा केंद्र गावातीलच सुशिक्षित बेरोजगारास द्या


- जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांची मागणी
- सरपंच प्रमोद आत्राम यांचे जि.प. उपाध्यक्षांना निवेदन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
अहेरी तालुक्यातील पेरमिली गावाच्या नावे महाआॅनलाईन केंद्राच्या दोन आयडी इतर गावातील लोक वापर करीत असून पेरमिली येथील नागरिकांना आॅनलाईनची कामे करण्यासाठी अहेरी येथे जावे लागत आहे. यामुळे बाहेर गावातील युवकांना दिलेले महाआॅनलाईन केंद्र रद्द करून पेरमिली येथील सुशिक्षित बेरोजगारास महाआॅनलाईन केंद्र देण्यात यावे, अशी मागणी सरपंच प्रमोद आत्राम यांनी जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना दिलेल्या निवेदनातून केली होती. निवेदनाची दखल घेत जि.प. उपाध्यक्षांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून सेतू केंद्र पेरमिली येथीलच युवकाला देण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पेरमिली येथील नागरिकांना विविध दाखल्यांची कामे आॅनलाईन करण्यासाठी तालुका मुख्यालयी जावे लागत आहे. याबाबत  चौकशी केली असता पेरमिली गावाच्या नावे महाआॅनलाईनच्या दोन आयडी असल्याचे कळले. सत्यनारायण दहागावकर रा. गडअहेरी व देवाजी मुंजूमकर रा. चिंतलपेठा या दोघांनी आॅनलाईन केंद्र पेरमिलीच्या नावे घेतले असल्याची माहिती मिळाली. मात्र याचा पेरमिली येथील जनतेला काहीही फायदा नाही. ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार ईश्वर शंकर कुंभारे रा. पेरमिली यांना सदर केंद्र देण्याचा ठराव पाठविला होता. मात्र या ठरावाचा कोणत्याही प्रकारे विचार न करता केंद्र इतरांना देण्यात आला. यामुळे नागरिकांना गैरसोय सहन करावी लागत आहे. या बाबीचा विचार करून गावातील बेरोजगार युवकाला लवकरात लवकर सेतु केंद्र सुरू करण्याची परवानगी मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-14


Related Photos