महत्वाच्या बातम्या

 महाशिवरात्रीच्या यात्रेत भाविकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या : आमदार डॉक्टर देवराव होळी



- मार्कंडा देव व चपराळा देवस्थानच्या अध्यक्षांसह, विविध विभागाचे मुख्य अधिकारी तथा प्रमुख विश्वस्तांची उपस्थिती
 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : महाशिवरात्रीच्या निमित्ताने मार्कंडा देवस्थान व चपराळा देवस्थान येथे लाखो शिवभक्तांची प्रचंड यात्रा भरते. या यात्रेमध्ये भाविकांना अडचणी व त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी अशी मागणी आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये केले. व्यवस्थेच्या संदर्भामध्ये बैठकीचे आयोजन करावे या आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्या मागणी वरून जिल्हाधिकारी यांनी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले.

बैठकीला मार्कंडा देवस्थान व चपराळा देवस्थानचे अध्यक्ष तथा विश्वस्त, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सौ ठाकरे, एम एस ई बी चे अधीक्षक अभियंता गाडगे तहसीलदार चामोर्शी, ग्रामपंचायत मार्कंडा व चपराळाचे सचिव बांधकाम व एम.ई सि. बी विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीमध्ये आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी मुख्य रस्त्यांची अवस्था योग्य नसल्याने यात्रे दरम्यान भाविकांना येणाऱ्या अडचणी बद्दल अधिकाऱ्यांना अवगत केले. त्यासाठी तातडीने उपाय योजना करण्यात यावी. यात्रा सुरू होण्यापूर्वीच यात्रेतील समस्या सोडवल्यास त्याचा आनंद भाविकांना घेता येईल त्यासाठी योग्य त्या उपाययोजना व नियोजन करावे अशी विनंती त्यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला केली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos