महावितरणच्या निष्काळजीपणामुळे महिलेने गमावला जीव, विद्युत तारा कोसळल्या अंगावर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सडक अर्जुनी :
गोरेगाव तालुक्यातील सेजगाव येथील  एका विवाहित महिलेला वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे आपला जीव गमवावा लागल्याची घटना काल १३ नोव्हेंबर ला दुपारी ३.३०  वाजताच्या सुमारास घडली. 
 अनिता नेवारे (३०) असे मृतक महिलेचे नाव आहे. महिला दुपारच्या सुमारास विहिरीकडून गुंडी मध्ये पाणी घेऊन घराकडे येत असताना विजेचा तार अंगावर पडल्याने विद्युत् प्रवाहामुळे जीव गमवावा लागला.  वीज वितरण कंपनीकडे विद्युत तार व्यवस्थित करण्यासंबंधी अनेकदा माहिती देऊनही सुव्यवस्थित करण्यात आले नाही. यामुळेच  घटना घडल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. सदर मृत महिलेच्या कुटुंबीयांना वीज वितरण कडून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.  Print


News - Gondia | Posted : 2018-11-14


Related Photos