बल्लारपूर पोलिसांनी ९५ लाख ७५ हजारांचा पकडलेला अवैध दारूसाठा केला नष्ट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर :
दारूबंदीनंतर चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारू तस्करी केली जात आहे. यासाठी अवैध दारू तस्कर विविध क्लृप्त्या लढवित आहेत. बल्लारपूर पोलिसांनी मागील वर्षभरात अनेक दारू तस्करांवर कारवाई करीत ९५  लाख ७५ हजारांचा दारूसाठा जप्त केला होता. या दारूसाठ्यावर रोडरोलर चालवून नष्ट करण्यात आला.
एप्रिल ते आॅक्टोबर २०१८ दरम्यान केलेल्या कारवाईत एकूण १९४ गुन्ह्यातील ९५ लाख ७५ हजार ७५० चा दारूसाठा कळमना मार्गावरील मोंटफोर्ट काॅन्व्हेंट समोरील एका छोट्या मार्गावर नष्ट करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक आक्ेकवार, पोलिस निरीक्षक गोपाल भारती, सहाय्यक पोलिस निरीक्षक धाबे, मोरर भोयर यांच्या उपस्थितीत १२ ते १५ मजूरांच्या सहाय्याने दारूसाठा नष्ट करण्यात आला. 

   Print


News - Chandrapur | Posted : 2018-11-14


Related Photos