महत्वाच्या बातम्या

 कृषी विभागातील आयुक्तांनी घेतली शिवार भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी बांधवाच्या थेट शेतावर मौजा वासेरा, तालुका सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर येथे विभागीय कृषी सहसंचालक विभाग नागपूर, राजेंद्र साबळे, तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर, भाऊसाहेब बराटे यांनी वासेरा गावातील प्रभाकर पुस्तोड़े पॅकहाऊस बांधकाम पाहणी केले. किशोर बोरकर भुईमूग लागवड, नागोराव लोखंडे हरभरा लागवड, आदित्य बोरकर मोहरी लागवड, महादेव बोरकर वर्मी कंपोस्ट यूनिट येथे भेट देऊन उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी कू. प्रिया शिंदे उपविभागीय कृषी अधिकारी नागभीड, ए.आर. महाले तालुका कृषी अधिकारी शिंदेवाही तसेच क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी जी.एस. कोल्हापुरे व कृषी पर्यवेक्षक वाय.जी. बारापात्रे, चिव्हाने, ढवले मंडल कृषी अधिकारी आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos