आरमोरी पोलिसांची दारू तस्करांवर कारवाई, १३ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / ठाणेगाव (आरमोरी) :
भुरट्या चोरांच्या बंदोबस्तासाठी आरमोरी शहरात पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या माहितीवरून दारू तस्करीच्या स्काॅर्पिओ वाहनासह १३ लाख २८ हजारांचा मुद्देमाल आरमोरी पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणातील आरोपी मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार झाला आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक परजणे, पोलिस हवालदार निलकंठ गोंगले, लक्ष्मण नैताम, केळझरकर आदी ११ नोव्हेंबर रोजी गस्तीवर होते. दरम्यान एमएच ३३ ए ५९११ क्रमांकाच्या स्काॅर्पिओ वाहनातून दारू तस्करी केली जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांना पाहताच चालकाने वाहन सोडून पळ काढला. पोलिसांनी वाहन ताब्यात घेवून तपासणी केली. वाहनात देशी दाच्या ८८ पेट्या आढळून आल्या. या दारूची किंमत ५  लाख २८ हजार रूपये आहे. आरोपीचा पाठलाग करून पोलिसांनी पकडले. मात्र पोलिसांसोबत झटापट करून आरोपी पळून जाण्यात यषस्वी झाला. पोलिसांनी एकूण १३ लाख २८  हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-13


Related Photos