सरपणासाठी गेलेल्या ठाणेगाव येथील इसमाचा आकस्मिक मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / ठाणेगाव (आरमोरी) :
सरपण आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या ५० वर्षीय इसमाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना आज १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
केशव मारोती नैताम असे मृतकाचे नाव आहे. केशव नैताम हे गावातील प्रकाश जुवारे यांच्यासोबत वैरागड मार्गावरील जंगलात गेले होते. सरपण गोळा करीत असतानां केशव नैताम हे अचानक दिसेनासे झाले. प्रकाश जुवारे यांनी आवाज दिला मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे जुवारे घाबरून गावाकडे परत आहे. गावातील नागरिकांना माहिती देवून नागरिकांसोबत जंगलात येवून शोधाशोध केली. यावेळी केशव नैताम हे जमिनीवर पडून असल्याचे आढळून आले. नागरिकांनी तपासणी केली असता ते मृत झाले होते. लागलीच पोलिस विभागाला माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. प्रेत शवविच्छेदनासाठी आरमोरी येथील उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. केशव नैताम यांच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सूना, नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. पुढील तपास आरमोरी पोलिस करीत आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-13


Related Photos