वर्धा येथील आरटीओ कार्यालयात तीन दलालांना अटक


- मुंबई येथील आयुक्त पथकाची कार्यवाही
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधि / वर्धा :
  परिवहन आयुक्त कार्यालय मुंबईचे  सहायक पोलिस आयुक्त (दक्षता) विभाग यांनी वर्धा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अचानक भेट देत तपासणी सुरु केली असल्याने या भेटीने सर्वत्र उडाली खळबळ होती.  यावेळी अनधिकृतरित्या कार्यालयात कागदपत्रांसह कामकाज करताना आढळलेल्या तीन खासगी इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध पोलीस कारवाई सुरू करण्यात आली आहे. 
 या कारवाईचा अहवाल परिवहन आयुक्तांना सादर करणार असल्याचीही  माहिती अधिकाऱ्यांनी दिली.  सहायक पोलिस आयुक्त प्रशांत कोलवाडकर यांची ही कारवाई असुन   सुभाष कदम, दिवाकर नागोसे, भास्कर बुटले असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.  यामधील गजु रघाटाटे हा फरार आहे . या चारही जणाविरूद्ध वर्धा शहर ठान्यात कलम १८८ भादवी तसेच सहकलम १२० नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे तपासी अधिकारी कोलवटकर यानी सांगितले.  Print


News - Wardha | Posted : 2018-11-13


Related Photos