महत्वाच्या बातम्या

 मातृभाषेचा अभिमान असावा : प्राचार्या डॉ. शारदा महाजन


- नमाद महाविद्यालयात मराठी भाषा पंधरवडा संपन्न 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : मराठी भाषेचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे. सध्याच्या काळात आपल्या मातृभाषेबद्दल महत्वाची भावना दिसून येते. मराठी, हिंदी व कोणतीही भाषा असो, भाषा हे विचार करण्याचे आणि व्यक्त होण्याचे माध्यम आहे. त्यामुळे मातृभाषेचा अपमान नाही अभिमान असावा, असे प्रतिपादन प्राचार्य डाॅ. शारदा महाजन यांनी केले.

गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालय येथील मार्गदर्शक प्रफुल पटेल, अध्यक्षा वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन, संचालक निखील जैन यांच्या मार्गदर्शनात मराठी विभागाच्यावतीने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्राचार्या डॉ. शारदा महाजन अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डाॅ. अर्चना जैन, वाणिज्य विभाग प्रमुख डाॅ. राकेश खंडेलवाल, प्रा. अर्चना अंबुले, प्रा. लोकेश कटरे उपस्थित होते. कवी कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर तथा मनोहर पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उद्घाटनीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अर्चना अंबुले, संचालन प्रा. लोकेश कटरे तर आभार निखिल बनसोड यांनी मानले.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात काव्यवाचन स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, स्वाक्षरी स्पर्धा यांचा समावेश होता. काव्यवाचन स्पर्धेत प्रथम क्र. राहुल पुसाम, द्वितीय पुरस्कार निखील बंसोड, हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक भारती कटरे, द्वितीय क्रमांक रिना पाचे, स्वाक्षरी स्पर्धेत प्रथम क्र. निखील बंसोड, द्वितीय क्र. सार्थक बोरकर यांनी पटकाविला. स्पर्धेचे परीक्षक मिलींद रंगारी, विनोद माने, प्रा. प्रकाश मेहर, डाॅ. उमेश चव्हाण यांनी केले.

समारोपीय कार्यक्रमांतर्गत मराठी संत साहित्याचे सामाजिक योगदान या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्या डाॅ. शारदा महाजन तर विचार मंचावर डाॅ. अर्चना जैन, डॉ. राकेश खंडेलवाल तर प्रमुख वक्ते म्हणून आदिलोक हाॅयस्कूल बोडुंदाचे प्राचार्य कुवरलाल वैद्य उपस्थित होते. प्राचार्य कुवरलाल वैद्य यांनी आपल्या मार्गदर्शनातून संत ज्ञानेश्वरापासून आजतागायत पर्यंत मराठी भाषेची थोरवी, यावर प्रकाश टाकला. समारोपीय कार्यक्रमाचे संचालन प्रा. लोकेश कटरे तर आभार प्रा. अर्चना अंबुले यांनी मानले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी विभागाच्या प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.





  Print






News - Gondia




Related Photos