गडचिरोली शहरात एकाच ठिकाणी आढळले दोन विषारी घोणस साप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
शहर प्रतिनिधी / गडचिरोली :
येथील पोटेगाव मार्गावरील एका चहाच्या दुकानात दोन विषारी घोणस साप आढळून आले. या सापांना सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीने पकडून जीवनदान दिले आहे.
काल १२ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास चहाच्या दुकानात साप असल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रेक्षागार मैदानावर सरावासाठी जाणाऱ्या युवकांनी तसेच पोटेगाव मार्गाने आवागमन करणाऱ्या  नागरिकांनी चांगलीच गर्दी केली. ही माहिती सर्पमित्रांना देण्यात आली. सर्पमित्र अजय कुकडकर, पंकज फरकाडे, अनुप म्हशाखेत्री, प्रशिक झाडे, विपुल उराडे, महेश निलेकर यांनी घटनास्थळी जावून सापांना पकडले. यानंतर सापांना पोटेगाव मार्गावरील जंगलात सोडून देण्यात आले.     उपस्थित काही जनांनी सदर साप बिनविषारी अजगर साप असल्याचे समजून जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्पमित्रांनी माहिती दिल्यानंतर नागरिकांनी जवळ जाण्याचे टाळले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. 

 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-13


Related Photos