महत्वाच्या बातम्या

 मराठा आरक्षणासाठी एकजुटीने लढा देऊ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना मराठा आरक्षण रद्द केले आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे.

मराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत असतात.

अश्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच मुद्यावरून आपले मत व्यक्त केले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर आपली प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू सर्वोच्च न्यायालयात आणखी प्रबळपणे मांडण्यासाठी, तसेच न्यायालयीन लढ्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येईल असे मोठे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. तसेच, मराठा समाजाचे आरक्षण मिळवण्यासाठी एकजुटीने लढा देऊ. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही आपली सर्वांचीच प्रामाणिक इच्छा असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले, तसेच आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकरता निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. या महामंडळासाठी जिल्ह्यातील सामाजिक न्याय भवन येथे जागा देण्यात येईल. या मंडळाच्या वित्त पुरवठ्याच्या अटींबाबत आणि अन्य बाबींबाबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.





  Print






News - Rajy




Related Photos