महत्वाच्या बातम्या

 अहेरी येथे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते बँटमिंटन स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न


बॅडमिंटन खेळाला प्रोत्साहन देणे काळाची गरज : माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : अहेरी तालुक्यात जवळपास १० वर्षांनंतर इलेव्हन स्टार स्पोर्टिंग क्लब, अहेरी तर्फे भव्य बँटमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आले. सिंगल व डबल्स मध्ये झालेल्या सामन्यांत खेळाडू आणि प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. ३ दिवस चाललेल्या या स्पर्धेत अनेक चुरशीचे सामने प्रेक्षकांनी बघितले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी बोलतांना, बँटमिंटन खेळल्याने शरीराचा उत्कृष्ट व्यायाम होतो. त्यामुळे अनेक व्याधीतून मुक्त होहू शकतो. नेहमी तंदुरुस्त राहण्यासाठी बँटमिंटन खेळणे ही काळाजी गरज आहे. याचे महत्त्व ओढवून पुढील वर्षी भव्य बँटमिंटन स्पर्धा अहेरी तालुक्यात आयोजित करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करू, असे प्रतिपादन राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी यावेळी केले.

यावेळी युवा नेते अवधेशराव बाबा, नगरसेवक अमोल गुडेल्लीवार, गिरीश मद्देर्लावार, अतुल पवार, संकेत मुरमुरवार, कुणाल गट्टूवार, पंकज नौनूरवार, रवी जोरगलवार, अंकित सिडाम सह इलेव्हन स्टार स्पोर्टिंग क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos