महत्वाच्या बातम्या

 आदिवासी देवी देवतांचे अभ्यासपूर्ण संशोधन, संवर्धन व ग्रामसभांचे सक्षमीकरण संदर्भात बैठक संपन्न


- गोंड, राज गोंड, गायते गोंड, माडिया गोंड, माडिया, बडा माडिया, या जमातीच्या नियोजित महाअधिवेशन बाबत चर्चा

- आमदार डॉ. देवराव होळी, ज्येष्ठ समाजसेवक देवाजी तोफा, यांच्या प्रमूख उपस्थितीत बैठकीचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : ग्रामसभा रायपुर तालुका जिल्हा गडचिरोलीच्या वतीने नवनिर्मित भगवान बिरसा मुंडा व क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानिमित्य गोंड, गायते गोंड, राज गोंड, माडिया गोंड, माडिया, बडा माडिया, या जमातीच्या देवी देवतांच्या अभ्यासपूर्ण संशोधन व  संवर्धन, ग्रामसभांचे सक्षमीकरण संदर्भात भव्य  महाअधिवेशनाचे आयोजन रायपूर येथे करण्यासंदर्भात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. 

या बैठकीला ज्येष्ठ समाजसेवक देवाजी तोफा, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश महाराज काटेंगे, आदिवासी विद्यार्थी संघाचे सरसेनापती नंदू भाऊ नरोटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शालिकराम उसेंडी, तहसीलदार डॉ. रवींद्र होळी, डॉक्टर बागराज धुर्वे, मोहन पुराम, परेश कोल्हे, प्रा. नरेंद्र मडावी, किशोर पाटील पोरेटी, ग्रामसभेचे अध्यक्ष बाजीरावजी वालको, बाजीरावजी नरोटे, अभिलाष काटेंगे, प्रामुख्याने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos