महत्वाच्या बातम्या

 कोरची : नातेवाईकांच्या तक्रारीनंतर शिक्षक अमरदीप रंगारी याला अटक


- २ जानेवारीला पत्नीने केली होती आत्महत्या

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / कोरची : कोरची तालुक्यातील गुटेकसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अमरदीप रंगारी याला ३ फेब्रुवारीला कोरची पोलिसांनी अटक केली असून २ जानेवारीला अमरदीप रंगारी याची पत्नी देवकी रंगारी यांनी कोरची येथील घरात विष प्राशन करून आत्महत्या केली होती. मिळालेल्या माहितीनुसार काही वर्षांपूर्वी अमरदीप रंगारी हा कोरची तालुक्यातील अंतरगाव येथे शिक्षक म्हणून कार्यरत असताना देवकी सोबत प्रेम संबंध सुरू झाले, व दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला व दोघे विवाहबद्ध सुद्धा झाले. लग्नानंतर अमरदीप व देवकी यांना दोन मुले झाली. परंतु मिळालेल्या माहितीनुसार मागील काही महिन्यापासून अमरदीप हा देवकीला शारीरिक व मानसिक त्रास देत होता व याच त्रासाला कंटाळून २ जानेवारीला देवकी हिने विष प्राशन करून आत्महत्या केली.

देवकी यांच्या नातेवाईकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याकरिता पोलीस स्टेशन कोरची येथे तक्रार दिली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी करून अमरदीप रंगारी याला अटक केली असून त्याच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार व आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे भादवि कलम ४९८ A व ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून कुरखेडा न्यायालयाने अमरदीप रंगारी याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फुलकुवर करीत आहेत. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos