ताडोबात वाघाने केला जिप्सीचा पाठलाग, पर्यटकांची घाबरगुंडी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
सचिन जीवतोडे / मासळ (बुज): 
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील आगरझरी बफर झोन मध्ये  अंगावर थरकाप आणणारी घटना घडली आहे.  पर्यटकांची  एक जिप्सी वाघ पाहण्यासाठी ताडोबा अभयारण्यात गेली असता, वाघ पाहून परतत होती. त्याच दरम्यान एक वाघ त्या जिप्सीच्या मागे लागला. त्यामुळे जिप्सीमध्ये बसलेल्या पर्यटकांची  घाबरगुंडी उडाली होती.
  गाडी मागे फहवणाऱ्या वाघाचा  व्हिडीओ  कालपासून वायरल होत आहे. हा विडिओ ताडोबा बाफर मधील आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात   दूरवरून तसेच विदेशातून पर्यटक वाघ बघण्याकरिता नेहमीच   येत असतात आणि ताडोबातील वाघ नेहमी वाहनांजवळ जवळ येत असतात.  जिप्सीच्या जवळून जातात.  असे बरेच व्हिडीओ आपण पाहत असतो आणि या आधी पण असे प्रकार झालेले आहेत.  सध्या आलेल्या  व्हिडीओमध्ये चक्क वाघ हा पर्यटकाच्या गाडी च्या मागे जोरात  धावताना दिसत आहे.  जणू काही पर्यटकांवर हल्लाच करणार आहे. भविष्यात वाघ पर्यटकांवर  हल्ला करू शकतो हेच  या व्हिडीओ ने सिद्ध केले आहे. ताडोबा च्या वन अधिकार्‍यानी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ताडोबा मध्ये गाईड व चालकांना  छायाचित्र काढण्यास सक्त  मनाई करायला पाहिजे. त्याठिकाणी येणारे पर्यटक  पैसा खर्च करून ताडोबा  प्रकल्प बघण्याकरिता येत असतात. मात्र तेच फोटो काढणे सोडून गाईड व चालक हेच फोटो काढतात व फेसबुक व्हाट्सअप वर आपलोड करतात.   पर्यटकांना मार्गदर्शन आणि सुरक्षा  म्हणून गाईड व चालक असतात . जर तेच फोटो काढण्यात मग्न राहणार तर पर्यटकांना सुरक्षा कोण देणार.  पर्यटकांची सुरक्षा  करणे  ही जबाबदारी गाईड आणि चालकांची असते. जर असेच प्रकार याठिकाणी घडत राहतील तर याठिकाणी पर्यटकांचे येणे कमी होण्यास वेळ लागणार नाही. यामुळे    वन विभागाने  लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2018-11-12


Related Photos