महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्हयात ३७ (१) (३) कलम लागू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : पोलीस अधिक्षक, गडचिरोली, यांचे साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत. मौजा सिरोंचा येथे, 08 फेब्रुवारी 2023 ते 09 फेब्रुवारी 2023 रोजी पर्यत हजरत वली हैदरशाह बाबा उर्स उत्सव साजरा होणार आहे. 18 फेब्रुवारी 2023 रोजी महाशिवरात्री यात्रा उत्सव व 19 फेब्रुवारी 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती जिल्ह्यात सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. तसेच काही राजकीय पक्ष,संघटना व इतर नागरिक हे धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा, मिरवणूक, सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडु नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्हयात 05 फेब्रुवारी 2023 चे 00.01 वा ते 19 फेब्रुवारी 2023 चे 24.00 वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम ,1951 चे कलम 37(1) (3) संपूर्ण गडचिरोली जिल्हयात लागू करण्यात आली आहे. असे अतिरीक्त जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos