महत्वाच्या बातम्या

 रेपणपल्ली येथे पकडली ४ लाख ४३ हजार ४८० रुपयाची दारु


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुद्ध पोलीस अधिक्षक निलोत्पल यांनी अवैध दारु विक्री करणाऱ्यावर कठोर कार्यवाहीचे निर्देश सर्व पोस्टे / उप-पोस्टे / पोमके प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत.

०३ फेब्रुवारी २०२३ रोजी पोलीस अधिक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधिक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधिक्षक (अहेरी) यतीश देशमुख व उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली रेपनपल्ली हद्दीत दारुची अवैध वाहतूक करीत असल्या बाबतची माहीती मिळाल्याने उप-पोस्टे रेपनपल्लीचे प्रभारी अधिकारी पोउनि गोविंद खटिगं, नापोशी मनोज नैताम, देवव्रत गयाली व पोशी व्यंकट यादव यांच्यासह पोस्टेच्या समोर सापळा रचुन बसले असता, अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन क्रं • एम. एच. ४९ एटि / २७०४ हिला थांबवुन पाहनी केली असता त्यामध्ये ९० मी.ली. मापाच्या रॉकेट संत्रा डिस्टलरी प्रवरानगर देशी दारुचे सिलबंद १०० पेटी कि. ३ लाख ४९ हजार १२५ रु वाहन क्र एम. एच. ३३ ए / ४४५३ यामध्ये ५०० मी.ली. मापाच्या किंगफीशर स्ट्रॉग प्रीमीयम बीयर सिलबंद ०२ पेटी कि. ९ हजार ५२० व ७५० मी.ली. मापाच्या इम्पेरीअल ब्लु सुपीरीअर ग्रेन व्हिस्की चे सिलबंद ११ पेटी किं. ८४ हजार ४८० असा एकूण ४ लाख ४३ हजार ४८० रु. चा माल अवैधरीत्या विक्री करण्याचा उद्देशाने जवळ बाळगुन वाहतुक करताना मिळून आल्यास, आरोपी नामे- कार्तिक बापु दुर्गे (२८), व्यवसाय चालक, रा. छल्लेवाडा मु. वार्ड क्र ०२ अहेरी यास ताब्यात घेतले व स्कॉरपीओ वाहन चालक नामे सुजल मंडल वय अंदाजे ४० वर्ष रा. चामोर्शी हा पळुन गेला असुन त्याचेवर म.दा. का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयातील पुढील तपास पोउपनि गोविंद खटिगं करीत आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos