महत्वाच्या बातम्या

 साहित्य संमेलनात आज निवडणूक आयोगाचा परिसंवाद


- वंचितांचे साहित्य व लोकशाहीवर रंगणार चर्चा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने साहित्य संमेलनात उद्या दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता वंचितांचे साहित्य व लोकशाही या विषयावर परिसंवाद रंगणार आहे.

परिसंवादाचे संवादक मुंबई विद्यापिठाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॅा. दीपक पवार आहे. या परिसंवादात अहमदनगर येथील दिशा पिंकी शेख, सोलापूर येथील बाळकृष्ण रेणके, मुंबई येथील हर्षद जाधव, कोल्हापूर येथील मुफिद मुजावर तर अमरावती येथील रझिया सुलताना सहभागी होणार आहे.

या परिसंवादात अप्पर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॅा. श्रीकांत देशपांडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. साहित्य संमेलनात मोठ्या प्रमाणावर साहित्य रसिक येत असतात. राज्य व राज्याबाहेरुन येणाऱ्या नागरिकांना निवडणूकीचे महत्व समजून सांगता यावे तसेच जनजागृतीसाठी या संमेलनाचा उपयोग करून घेण्यासाठी नाशिक, उगदीर नंतर वर्धा येथील संमेलनात आयोगाचा हा विशेष जनजागृती उपक्रम राहविण्यात येत आहे. या परिसंवादाचा आस्वाद घेण्याचे आवाहन निवडणुक उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos