पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात भारतीय सैन्याचा एक जवान शहीद


वृत्तसंस्था / श्रीनगर :  सीमेपलीकडून पाकिस्तानी सैन्याद्वारे करण्यात आलेल्या गोळीबारात आज भारतीय सैन्याचा एक जवान शहीद झाला आहे.  केशव गोसावी (२९) असे शहीद जवानाचे नाव आहे. ते महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील श्रीरामपूरचे रहिवासी होते.
जम्मूच्या नाओशेरा सेक्टरमध्ये दुपारी २ वाजून ४५ मिनीटांनी पाकिस्तानी सैन्याने गोळीबाराला सुरुवात केली. भारतीय जवानांनीही या हल्ल्याचं जोरदार प्रत्युत्तर दिलं. मात्र या गोळीबारात  जवान केशव गोसावी हे जखमी झाले. मात्र रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना केशव गोसावी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी यशोदा गोसावी हा त्यांचा परिवार आहे. केशव गोसावी यांनी देशासाठी दिलेलं बलिदान हे कधीही व्यर्थ जाणार नाही, असं भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी गोसावी यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटलं आहे.  Print


News - World | Posted : 2018-11-12


Related Photos