दंतेवाड्यात नक्षल्यांनी केला आयईडी स्फोट, आज पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू


वृत्तसंस्था / रायपूर :  छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान आज  सोमवार १२ नोव्हेंबर रोजी सुरु आहे. तत्पूर्वी सकाळच्या सुमारास नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दंतेवाडा येथील कटेकल्याण ब्लॉकमधील तुमाकपल कॅम्प येथे आयईडी  स्फोट झाला. नक्षलवाद्यांनी २ किलो वजनाचा आयईडी येथे पेरला होता. या स्फोटाबाबत अद्याप अधिक माहिती समजू शकलेली नाही. छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान आज होत आहे.
दरम्यान, दंतेवाडा येथे शांततेत मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. येथे मतदान १२ तासांवर आले असताना नक्षलवाद्यांनी रविवारी घडवलेल्या आयईडी स्फोटात सीमा सुरक्षा दलाचा जवान शहीद झाला, तर एक माओवाद्याचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले होते.   Print


News - World | Posted : 2018-11-12


Related Photos