गडचिरोली -चामोर्शी - आष्टी महामार्गाची दुरुस्ती तातडीने करा : आमदार डॉ. देवराव होळी


- रस्त्यावर जाऊन केली खडड्यांची पाहणी 
-  येत्या तीन दिवसात पूर्ण खड्डे न  बुजविल्यास रस्त्यावर उतरणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
गडचिरोली - चामोर्शी - आष्टी या महामार्गाची स्थिती अत्यंत दयनीय झालेली असून रस्त्या रस्त्यात खड्डे पडलेले असल्याने आतापर्यंत अनेक लोकांचा मृत्यू रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात झालेला आहे. त्यातच   चामोर्शी - आष्टी महामार्गावरील खड्डे अत्यंत जीवघेणे झालेले असल्याने हे खड्डे  येत्या तीन दिवसात न बुजविल्यास आपण याक्षेत्राचा आमदार या नात्याने  रस्त्यावर उतरू असे  गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.  देवराव  होळी यांनी म्हटले आहे. 
 पावसामुळे गडचिरोली -चामोर्शी - आष्टी हा महामार्ग  खराब झालेला आहे.  परंतु पावसाळा संपून बराच कालावधी लोटला असूनही या रस्त्यांच्या दुरुस्ती-करणाचे काम अजून पर्यंत हाती घेण्यात आलेले नाही तसेच  पावसाळ्यात मुरूम टाकून तात्पुरत्या स्वरूपात काही खड्डे बुजविण्यात आले मात्र तात्पुरती बुजवण्यात येणारे खड्डे हे दुसऱ्या दिवशी पुनः तयार होऊन लोकांचा बळी घेत आहेत. त्यामुळे सदर मार्गावरील खड्डे बुजवीन्याचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी व संबंधित कंत्राटदाराने खड्डे बुजविण्याचे काम तातडीने सुरू  करावे ज्या कंत्राटदाराला  या कामाची निविदा मिळाली आहे त्यांनी सदर काम तातडीने सुरू करावे असे न केल्यास अशा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे तसेच कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात चौकशी करावी व त्यातील दोषींवर तात्काळ कारवाईचे निर्देश द्यावेत  असे न केल्यास आपण रस्त्यावर उतरू असेही  आमदार डॉ. देवराव  होळी यांनी म्हटले आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-11


Related Photos