कोठरी येथील बौद्धविहार परिसराच्या विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही : आमदार डॉ. देवराव होळी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
कोठरी येथील  बौद्धविहार परिसरात असलेल्या या निसर्गमय वातावरणातील भागास पर्यटनस्थळ घोषित करण्यात आलेले असून आपल्या पुढाकारातून या पर्यटनस्थळाचा विकास करण्यासाठी ५० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.  त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध झालेली आहे.  हे केंद्र केवळ जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील बौद्ध बांधव उपासक - उपासिका यांच्यासाठी प्रेरणादायी असल्याने या स्थळासाठी आपण कोणत्याही स्थितीत निधी कमी पडू देणार नाही असे  अश्वासन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार  डॉ. देवराव  होळी   यांनी दिले.    
   चामोर्शी तालुक्यातील कोठरी माडेमुधोली नालासंगम येथील अरण्यवास बौद्धविहारात वर्षावास समापन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.  बौद्धविहार परिसरातील  बालउद्यान सौन्दर्यीकरण कामांचे लोकार्पण कारण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी भन्ते भगीरथजी, जिल्हा परिषद सदस्य नामदेवराव सोनटक्के,भाजप तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, घोट सरपंच विनय बारसागडे, भाजपा बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर तनपुरे, परशुराम दूधबावरे, आलापल्ली वनपरिक्षेत्र क्षेत्रसहाय्यक दिलीप कौशिक ,प्रशांत शहा, यांचेसह असंख्य भाजपा पदाधिकारी बौद्ध बांधव भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.    Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-11


Related Photos