ड्रेनेजमधून शेतीसाठी पाणी उपसताना दोन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू


- शिर्डीतील घटना 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / शिर्डी :
स्थानिक नगरपंचायतीच्या ड्रेनेजमधून शेतीसाठी पाणी उपसताना दोन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला.  शिर्डीतील कालिकानगर भागात शनिवारी ही घटना घडली. पंधरा ते वीस फूट खोल ड्रेनेजमध्ये पडून संदीप अशोक कोते (वय ४८) व गंगाधर गाडेकर (वय ४२) यांचा मृत्यू झाला. 
या दोघांना बाहेर काढण्यासाठी प्रथम नगरपंचायतचे पथक आले; मात्र, पुरेसे साहित्य नसल्याने त्यांना यश आले नाही. त्यानंतर साईबाबा संस्थानचे पथक आले. पथकाने दोघांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले; मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या दोघांना वाचवण्यासाठी चेंबरमध्ये उतरलेल्या एकाला सुखरूप काढण्यात यश आले आहे.  
शिर्डीच्या आसपास ऊस आणि अन्य शेती आहे. पाणी टंचाई असल्याने शेतकरी नगरपंचायतीच्या ड्रेनेजलाइनमध्ये पंप टाकून पाणी उपसतात आणि ते शेतीला देतात. कोते आणि गाडेकर पंप सुरू करण्यासाठी गेले असता ड्रेनेजमध्ये गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. २०१६ मध्येही अशाच प्रकारे चार शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला होता.  Print


News - Rajy | Posted : 2018-11-11


Related Photos