महत्वाच्या बातम्या

 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी २० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / नागपूर : शासनाने नुकत्याच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नियमावली विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या तीन स्वतंत्र वर्षांच्या पुरस्कारासाठी राज्यातील जेष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांच्यामार्फत अर्ज मागविण्यासाठी 20 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याऱ्या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडूंनी विहीत मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी केले आहे.

क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या  खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासन शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करते.

अर्जाचा नमुना https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्जाचा नमुना डाऊनलोड करावे व व्यवस्थितरित्या भरून संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यास  मुदतवाढ 20 फेब्रुवारी अशी देण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा विभागाच्या  https://sports maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील लिंकवर पहावे.    





  Print






News - Nagpur




Related Photos