धोत्रा चौरस्ता येथे बसने वृद्ध महीलेला उडवले, महिला जागीच ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / हिंगणघाट :
  हिंगणघाट - वर्धा मार्गावर  असलेल्या धोत्रा चौरस्ता येथे आज ११ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजताच्या  सुमारास वर्धा वरून हिंगणघाट कडे जाणारी एस टी बस क्र .एम एच ४० वाय ५२५० या ने वर्धा वरून धोत्रा या गावात एका नातेवाईकांच्या शेतात कापुस वेचन्या साठी जात असलेल्या  कालंदी राठोड (६५) या महिलेला धडक दिली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला आहे. 
महिला वर्धा वरून धोत्रा चौरस्ता येथे बस मधुन उतरली व  रास्ता ओलांडत असताना   अचानक बस सुरू झाली व ज्या बसमधुन ती महीला उतरली त्याच बसने तीला उडवले . त्यानंतर बस चालक हिंगणघाट कडे जाण्यासाठी निघाला.  परंतु धोत्रा येथील युवक गोवींद माचेवार व नीखील पोहाने यांनी पाठलाग करून बसला थांबवले व पोलीसांच्या स्वाधीन केले. सदर घटना घडली तेव्हा धोत्रा येथील मयुर गोल्हर ,चंदु पोहाने,श्रीकृष्ण पोहाने, सुरज हिंगे हे उपस्थीत होते .
घटनास्थळी अल्लीपुर पोलीस स्टेशन चे ठानेदार  प्रवीन डांगे यांनी भेट देऊन शव शवविच्छेदनासाठी   वर्धा येथे पाठविले. 



  Print






News - Wardha | Posted : 2018-11-11






Related Photos