महत्वाच्या बातम्या

 शौर्य दिवसानिमित्ताने वीरपत्नींचा सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वतीने काल शौर्य दिवस साजरा करण्यात आला यावेळी वीर माता व वीरपत्नी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आकाश अवतारे, तर उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाकरीता जिल्हयातील माजीसैनिक, विरपत्नी व संत शिवराम महाराज विदयालयाचे विदयार्थी व शिक्षक उपस्थित हाते.

भारतीय सैन्य दलाने 29 सप्टेंबर 2016 रोजी पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जीकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्यांचा बिमोड केला. त्यामध्ये भारतीय सैन्याची धैर्य, शौर्य, पराक्रमाची अभिमानास्पद कामगिरी जनतेपर्यंत जावी म्हणून शौर्य दिवस संपूर्ण देशात साजरा केला जातो.

यावेळी अवतारे यांनी शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण केली. वीरपत्नी ज्योती हिरामन सिंद्राम यांचे पुष्पगुच्छ व  शाल श्रीफळ देवून सन्मान केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपिक सुधाकर लुटे, यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी कार्यालयातील कर्मचारी घनमारे, आंभोरे, हटवार यांनी परिश्रम घेतले.





  Print






News - Bhandara




Related Photos