महत्वाच्या बातम्या

 सोमवारला जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. ६ फेब्रुवारी २०२३ सोमवारला दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, परिषद कक्ष येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकशाही दिनाच्या १५ दिवसाआधी जनतेच्या तक्रारी, अर्ज संकीर्ण शाखा जिल्हाधिकारी कार्यालय येथे दोन प्रतीत स्विकारण्यात येतील. न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व/अपील प्रकरणे, सेवाविषयक, आस्थापना विषयक, सामुहिक कामासंबंधीत तसेच तालुका लोकशाही दिनी सादर न केलेले तक्रार/अर्ज स्विाकारले जाणार नाही, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांनी केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos