महत्वाच्या बातम्या

  मुलचेरा येथे वाचन प्रेरणा दिन साजरा



विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / मुलचेरा  :- 15 ऑक्टोबर 2022 ला मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, येल्ला, पंचायत समिती मूलचेरा येथे वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आले. सर्वप्रथम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री तिरुपती आरे यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी दीप प्रज्वलन करून प्रतिमेला माल्यार्पण केले. काही विद्यार्थ्यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. सदर शाळेचे सहशिक्षक श्री लक्ष्मण रत्नम यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन का म्हणतात? याबद्दल सविस्तर माहिती दिली. सर्व विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील विविध पुस्तकांचे वाचन केले. याप्रसंगी डॉ. महेंद्र मंडल धन्वंतरी चिकित्सालय, आल्लापल्ली यांनी सदर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बुक आणि पेन देऊन सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री तिरुपती आरे, पदवीधर शिक्षक श्री के. बी. गुंड, सहशिक्षक श्री लक्ष्मण रत्नम श्री के. एम. पुण्यमूर्तीवार यांनी अथक प्रयत्न केले. संचालन श्री गुंड तर आभार श्री पुण्यमूर्तीवार यांनी मानले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos