चिमुर तालुक्यातील आमडी येथील अवैध दारूविक्रीच्या विरोधात महिला एकवटल्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चिमूर :
चंद्रपुर जिल्ह्यात दारू बंदी असताना सुद्धा चिमुर तालुक्यातील आमडी येथे अवैध दारूविक्री जोमाने सुरु आहे . दारू विक्रीच्या  विरोधात गावातील महिलांनी पुढाकार घेतला असून नुकतेच महिलांनी जिल्हा परिषद शाळेसमोरील खुल्या पटांगणात ग्रामसभा घेऊन गावात दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला. 
चंद्रपुर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून दारूबंदी झाली असली तरी गावा गावात अवैध दारू विक्री जोरात सुरु आहे.  जिल्ह्यात दारूबंदी असताना सुद्धा दारूबंदी करिता ग्रामसभा घ्यावी लागते ही लाजीर्वाणी बाब असल्याचा सुर ग्रामसभेत निघत होता.  ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी रुखमा विट्ठल डमभारे होत्या, सभेला चिमुर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक प्रमोद मड़ामें,  सरपंच वामन गुळधे, उपसरपंच विजू झाड़े, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रफुल डरे, ग्रामसेवक एकुड़े, ग्राम पंचायत सदस्या कोमल पांडे, शोभा डुकसे, अर्चना गराठे, अनु खांडेकर, यांच्यासह शेकडो महिला ग्रामसभेला उपस्थित होत्या, यावेळी गावातील होतकरु तरुण मंडळी व गावकऱ्यांनी सुद्धा महिलांच्या मागणीला समर्थन दर्शवून एक्मताने दारूबंदीचा ठराव घेतला.   Print


News - Chandrapur | Posted : 2018-11-10


Related Photos