सिरोंचा तालुक्यातील कोत्तापल्ली येथे नदीत बुडून युवकाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अंकीसा
:  सिरोंचा तालुक्यातील कोत्तापली येथे दिवाळीच्या दिवशी नदीत अंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. सदर घटना ७ नोव्हेंबर रोजी घडली. 
प्रविण सारय्या कुम्मरी (१८) असे मृतक युवकाचे नाव आहे.  मृतक प्रवीण ७ नोव्हेंबर रोजी सकाळी    आपल्या मित्रा सोबत दिवाळीच्या दिवशी  गंगा स्नान करण्यासाठी आईला न सांगता  निघाला होता. सकाळी बाहेर गेलेला मुलगा उशिरापर्यंत  घरी  आला नाही. यामुळे शोधाशोध सुरु झाली. त्याच्या मित्रांना विचारणा केली असता सदर घटना उघडकीस आली.    Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-10


Related Photos