महत्वाच्या बातम्या

 आंतरराष्ट्रीय तृणधान्य निमीत्य रॅलीचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : २०२३ हे वर्ष शासनाने आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. तृण भरडधान्याचे आहारात खूप महत्व आहे. आहारात त्याचा वापर करण्यासाठी नागरिकांना प्रेरीत करण्याच्या दृष्टीने उद्या ३ फेब्रुवारीला रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय तृणधान्य निमीत्य जिल्हा कृषी विभागामार्फत ३ ते ४ फेब्रुवारीला सकाळी ९.३० वाजता क्रिडा व सांस्कृतीक कार्यक्रमाचे व रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या हस्ते होणार असून रॅली तालुका कृषी अधिकारी, कार्यालय, सिव्हील लाईन्स ते जिल्हा क्रिडा संकुलपर्यंत आयोजीत करण्यात आहे आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos