महत्वाच्या बातम्या

 मुलांचे शासकीय गड्डीगोदाम वसतिगृह लवकरच विद्यार्थ्यांसाठी तयार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : आयुक्त समाज कल्याण याच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नागपूर येथे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधिकारी व पदाधिकारीसोबत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, गड्डीगोदाम या वसतिगृहाचे नुतनीकरणाचे काम पूर्ण झालेले असून वसतिगृहाचे लवकरच उद्घाटन करण्यात येवून विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येईल.
मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, गड्डीगोदाम हे वसतिगृह विद्यार्थ्यांना राहण्यासाठी सर्व सोयी सुविधेसह लवकरच उपलब्घ करुन देण्यात येईल, असे बैठकीस उपस्थित नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उदा. पलंग, मॅट्रेस, पिलो कव्हर अशा सर्व सुविधांसह तयार करुन द्यावे, असे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी उपस्थित नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथील अधिकाऱ्यांना सांगितले.तसेच बैठकीमध्ये संत चोखामेळा येथील बांधकामासंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला. त्याचप्रकारे दीक्षाभूमी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर, संविधान पार्क आदी बांधकामासंदर्भात आढावा घेण्यात आला.
बैठकीस समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुकेशिनी तेलगोटे, नागपूर सुधार प्रन्यासचे अधिक्षक अभियंता भांडारकर, कार्यकारी अभियंता चिमुरकर, कार्यकारी अभियंता श्रीमती ईखार, वास्तुशास्त्रज्ञ संदिप कांबळे उपस्थित होते.





  Print






News - Nagpur




Related Photos