महत्वाच्या बातम्या

 क्रीडासत्रातुन निर्माण होते सांघिकतेची भावना : आयुक्त विपीन पालीवाल


- मनपा शालेय क्रीडासत्राला सुरवात  

- १७०० विद्यार्थ्यांचा सहभाग

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : मानसिक व शारीरिक स्वाथ्यासाठी मैदानी खेळ आवश्यक आहेत. जिंकलो तर यश कसे पचवावे व हरलो तर नवीन उमेदीने कसे उभे राहावे हे खेळ आपल्याला शिकविते.सहनशीलता,शिस्त, धैर्य, आत्मविश्वास, खेळात वाद झाला तर संयमाने कसा सोडवावा हे सगळे गुण या क्रीडासत्रातुन निर्माण होऊन सांघिकतेची भावना विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागेल अशी आशा आयुक्त विपीन पालीवाल यांनी व्यक्त केली.

कोहिनुर मैदानात चंद्रपूर महानगरपालिका शाळांच्या २०२२-२३ क्रीडासत्राला १ फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते उदघाटन करून सुरवात करण्यात आली. याप्रसंगी सहायक आयुक्त विद्या पाटील,मुख्य लेखाधिकारी मनोहर बागडे, प्रशासन अधिकारी नागेश नीत व्यासपीठावर उपस्थीत होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी मनपाच्या शाळांची पटसंख्या वाढल्याचे कौतुक केले तसेच आहे त्या साधनांतून आनंद कसा घ्यावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे मनपा शाळांचे क्रीडासत्र असल्याचे सांगितले. क्रीडासत्रात मनपाच्या २७ शाळांचे १७०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ३ दिवसीय क्रीडासत्रात खो-खो,कबड्डी,गोळा फेक, रीले रेस, लांब उडी, वैयक्तीक कौशल्य इत्यादी विविध मैदानी खेळ खेळले जाणार आहेत. ३ दिवस विद्यार्थ्यांच्या भोजनाची तसेच मध्यान्हात दुध देण्याची व्यवस्था मनपातर्फे येणार आहे.  

रैयतवारी कॉलरी मराठी प्राथ. शाळा,भा. डॉ. भीमराव आंबेडकर शाळा, पंडित जवाहरलाल नेहरू प्राथ. शाळा यांच्यातर्फे शो ड्रील तर सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांतर्फे कराटे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले तसेच लेझीम, बलुन ड्रील, समुह गान प्रस्तुत करण्यात आले. यावेळी शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांना खेळभावनेची तर आयुक्तांद्वारे पंचांना निष्पक्षतेची शपथ देण्यात आली. संचालन स्वाती बेत्तावार यांनी तर सुनील आत्राम यांनी आभार प्रदर्शन केले.                  

याप्रसंगी प्रमुख कार्यवाह वामन कुमरे, सय्यद शहजाद, अरुण वलके,मधुकर मडावी, शरद शेंडे, रवींद्र गोरे, राजकुमार केसकर, अमोल कोटनाके, प्रशांत आकनुरवार, शिवलाल इरपाते, भुषण बुरटे, संदीप जवादवार, सुचिता मालोदे, संजना पिंपळशेंडे, परिणय वासेकर, बबिता उईके,उमा कुकडपवार, विद्यालक्ष्मी कुंडले उपस्थीत होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos