महत्वाच्या बातम्या

 जिल्ह्यातील फुटबॉल खेळाडूंना मिळणार जर्मनीत प्रशिक्षणाची संधी


- जिल्हास्तरीय एफ. सी. बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल स्पर्धा
- 14 व 15 फेब्रुवारी रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे स्पर्धेचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : राज्यात फुटबॉल खेळाचा विकास व प्रसारासाठी फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनी यांच्याशी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने करारनामा झाला आहे. फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनी हा जागतिक अग्रगण्य लोकप्रिय फुटबॉल क्लब पैकी एक आहे. त्याअनुषंगाने, जिल्हा स्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन 14 व 15 फेब्रुवारी 2023 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे करण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील शाळांनी आपल्या शाळेतील 14 वर्षा आतील मुलांच्या संघाची नोंदणी, प्रवेशिका विहित नमुन्यात 1 ते 9 फेब्रुवारी 2023 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे सादर करावे. तसेच अधिक माहिती करीता क्रीडा मार्गदर्शक संदीप उईके 9975862469 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय तसेच फुटबॉल क्लब बायर्न यांच्या करारामध्ये क्रीडा नैपुण्याचा शोध घेऊन त्यांना जर्मनी येथे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यातील 14 वर्षाखालील मुलांच्या एफ. सी. बायर्न महाराष्ट्र कप स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. फुटबॉल क्लब बायर्न यांच्याशी झालेल्या करारनाम्यामुळे राज्यात 14 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धा आयोजित करून त्यातून निवडलेल्या 20 खेळाडूंना म्युनिक, जर्मनी येथे जाणे-येणे, निवास व प्रशिक्षण आदी बाबींवर खर्च करण्यात येणार आहे. राज्यातून 20 खेळाडू जर्मनी येथे सदर प्रशिक्षणासाठी जाण्याकरीता क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषदेअंतर्गत एफ.सी. बायर्न महाराष्ट्र कप स्पर्धेचे 14 वर्षा आतील मुलांच्या गटाचे आयोजन जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर करण्यात येणार आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos