महत्वाच्या बातम्या

  शिवणी येथे वन वणवा नियंत्रण तथा मानव-वन्यजीव संघर्ष कार्यशाळा संपन्न 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिंदेवाही : शिवणी वनपरीक्षेत्र कार्यालय येथे खोरे विभागीय वन अधिकारी (कोअर) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपुर यांचे अध्यक्षतेखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेला योगेश घारे, पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन सिन्देवाही, बी. सी येळे सहाय्यक वनसंरक्षक (जंकास-१) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपुर, बी. के तुपे वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रादे) शिवणी, योगिता मडावी वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रादे) पळसगाव आणि विकास तुमराम पी.आर.टी समन्वयक हजर होते. सदर वनवणवा नियंत्रण कार्यशाळेत वन परीक्षेत्र शिवणी व पळसगाव परिक्षेत्रातील वन कर्मचारी, ३२ वनरक्षक, ६ वनपाल, ७० पी.आर.टी सदस्य, ३० फायर वाॅचर, १५ फडीमुंशी, ४५ पर्यटन मार्गदर्शक, १९ जिप्सी चालक, व इतर वनमजुर ८३ असे एकुन ३०० वन कर्मचारी व मजुर उपस्थित होते.

 खोरे व बी. सी येडे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपुर यांनी वनवणवा नियंत्रण बाबत मार्गदर्शन केले. तसेच योगेश घारे पोलिस निरीक्षक सिंदेवाही यांनी मानव-वन्यजीव संघर्ष हाताळण्याबाबत मार्गदर्शन केले. सन २०२२ या वर्षात शिवणी व पळसगाव परिक्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल उपस्थित वनकर्मचारी, हंगामी, बारमाही मजुर, पीआरटी सदस्य, फायर वाॅचर, फडीमुंशी, पर्यटन मार्गदर्शक, जिप्सीचालक, गेट मॅनेजर, गेट स्वच्छक यांना प्रशस्तीपत्रक देवुन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन वनपरीक्षेत्र अधिकारी शिवणी यांचे तर्फे एस.एन प्रधान क्षेत्रसहाय्यक शिवणी, एस.वाय बुल्ले क्षेत्र सहाय्यक कुकडहेटी, एम.डी पेंदोर क्षेत्र सहाय्यक नलेश्वर, एल.के मेश्राम वनरक्षक शिवणी, ए.डब्लु गायकवाड वनरक्षक पिपरहेटी १, यांनी यश्वस्वीरित्या पुर्ण केले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बी.के तुपे वनपरीक्षेत्र अधिकारी शिवणी यांनी केले. व जेवणाची व्यवस्था करुन कार्यक्रमाची सांगता केली.





  Print






News - Chandrapur




Related Photos