महत्वाच्या बातम्या

 आदिवासी विकास विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा १ ते ३ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहेत. या क्रीडा स्पर्धांचे उदघाटन १ फेब्रुवारीला दुपारी चार वाजता मानकापूर येथील क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. या स्पर्धेत अंदाजे तीन ते साडे तीन हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

आदिवासी समाजातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, भावी जीवनातील उत्कृष्ट वाटचालीकरिता आणि पारंपारिक कलागुणांच्या संवर्धनाकरिता आदिवासी विकास विभागातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात येतात. या स्पर्धेचे उदघाटन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे करतील. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वनामतीच्या संचालक मित्ताली सेठी असणार आहेत. तर विशेष अतिथी क्रीडा उपसंचालक शेखर पाटील असतील.

बक्षीस वितरण तथा समारोपीय कार्यक्रम शुक्रवार 3 फेब्रुवारीला होणार आहे. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, प्रमुख अतिथी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे असतील.

उदघाटन व समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, उपायुक्त दशरथ कुळमेथे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी दीपक हेडाऊ यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos