महत्वाच्या बातम्या

 ७ जिल्ह्यांतील नेहरू युवा केंद्राची युवा संसद उत्साहात साजरी होणार


विजयी स्पर्धक राज्यस्तरीय साठी पात्र

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्रातर्फे आयोजित राष्ट्रीय युवा संसद उत्सव फेब्रुवारीमध्ये होणार आहे. तत्पूर्वी ७ जिल्ह्यांचा जिल्हास्तरीय युवा संसद कार्यक्रम २८ जानेवारीला ऑनलाईन पद्धतीने नागपूरमध्ये घेण्यात आला. विजयी स्पर्धक राज्यस्तरीय युवा संसदेत सहभागी होतील.

ऑनलाईन युवा संसदेचे उद्घाटन नेहरू युवा केंद्र महाराष्ट्र व गोवा राज्याचे संचालक प्रकाशकुमार मनुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सागर राठी, विनय चावला, खुशबू सोलंकी, अविनाश शिरसाट, निनाद जैन यांनी परीक्षण केले.

युवांच्या नेतृत्व आणि वक्तृत्व गुणांना वाव देण्यासाठी नेहरू युवा केंद्रातर्फे युवा संसद उत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोदिया जिल्ह्यांसाठी युवा संसद घेण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यातील १० स्पर्धकांना संधी देण्यात आली होती. त्यात स्पर्धकांनी स्वास्थ, कल्याण एवं खेल युवाओं के लिये अजेंडा, कौशल विकास : युवा को सशक्त बानाने की कुंजी में से एक, सोशल मीडिया : युवा दृष्टिकोन या विषयावर ४ मिनिटात आपले वक्तृत्व सादर केले.

प्रत्येक जिल्ह्यातून दोन विजेत्या स्पर्धकांची निवड करण्यात आली. यात नागपूर जिल्ह्यातून प्रथम नैंसी पांडे, द्वितीय विशाल खरचवाल, वर्धा प्रथम श्रुतिका ठाकूर, द्वितीय शंकर शिरामने, यवतमाळ प्रथम सलमान खान, द्वितीय साहिल दार्णे, भंडारा प्रथम महेश मेश्राम, द्वितीय श्वेता खोब्रागडे, गडचिरोली प्रथम अरबाज शेख, द्वितीय ईशा मुंगेवार, चंद्रपूर प्रथम पुल्कित तुपत, साक्षी बेले आणि गोदिया जिल्ह्यातून प्रथम सलेहा खान, द्वितीय मयुरी गौतम यांचा समावेश आहे. विजयी स्पर्धक ४ फेब्रुवारीला राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी उदयवीर यांनी सांगितले.





  Print






News - Nagpur




Related Photos