महत्वाच्या बातम्या

 आरसेटीने प्रदान केलेल्या प्रशिक्षणाचा वापर करून स्वरोजगार उभारून आपली आर्थिक उन्नती करा : आ. डाॅ देवराव होळी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : भूतकाळात झालेल्या लहानशा चुकीने अर्धेअधिक आयुष्य तुरुंगात गेल्यानंतर इथून परत जातांना आरसेटी गडचिरोली यांनी प्रदान केलेल्या प्रशिक्षणाचा वापर करून स्वयंरोजगार उभारावा आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त करून समाजात स्वाभीमानाचे जीवन जगावे असा संदेश गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवराव होळी यांनी केले ते ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजीत आणि बँक ऑफ इंडिया द्वारा संचालीत ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी) गडचिरोली यांनी गडचिरोली कारागृहातील बंदीवाना साठी आयोजीत केलेल्या भाजीपाला लागवड व नर्सरी व्यवस्थापन या १० दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमाचे प्रमूख अतिथी स्थानावरून बोलत होते. या प्रसंगी अध्यक्ष म्हणून संस्थेचे संचालक कैलाश बोलगमवार, कारागृह प्रशासनाचे अधिकारी ब्रह्मा चोपकार, कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम व पुरुषोत्तम कुनघाडकर, कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी भडके, आरसेटी श्रेष्ठता केंद्र बंगलोरचे प्रतिनिधी पीडी काटकर, २५ बंदीवान प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. 

२२ जानेवारी २०२३ यादिवशी प्राशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. सूचीत लाकडे तसेच तालुका कृषी कार्यालयाचे, तालूका तंत्रज्ञान व्यवस्थापक हेमंतकुमार उंदीरवाडे यांनी बंदीवानांना मार्गदर्शन केले.

समारोपीय कार्यक्रमात देवीदास दडमल या बंदीवानाने आपल्या मनोगतातून शेतकऱ्याची व्यथा सांगीतली. समारोपीय कार्यक्रमात उत्कृष्ठ बंदीवानांना मान्यवरांचे हस्ते प्रशस्तीपत्राद्वारे पुरस्कृत करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन कार्यक्रम समन्वयक पुरूषोत्तम कुनघाडकर यांनी केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos