महत्वाच्या बातम्या

 अधिकारी पदाच्या परीक्षेसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : संरक्षण सेवेमध्ये अधिकारी पदाच्या परीक्षेसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य शासनामार्फत प्री कॅडेट ट्रेनिंग सेंटर नाशिक रोड, नाशिक येथे १ फेब्रुवारी ते ९ एप्रिल या कालावधीत हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण कालावधीत निवास, भोजन व्यवस्था आणि प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींना पुरविण्यात येणार आहे. इच्छुकांनी आफिसर इन चार्ज, प्री कॅडेट ट्रेनिंग सेंटर, नाशिक रोड, नाशिक किंवा  ०२५२-२४५१०३२ किंवा ९१३०२७१६२६ या दूरध्वनी क्रमांकावर अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.





  Print






News - Nagpur




Related Photos