महत्वाच्या बातम्या

 एफ. सी. बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कपचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : राज्यातील फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढीस लागून खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांना फुटबॉल खेळातील तांत्रीक प्रशिक्षण, क्रीडा नैपुन्याचा शोध तसेच योजनाबद्ध प्रशिक्षण, पायाभूत सुविधा वाढीस लागण्याकरीता क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनी यांचेशी करारणामा झालेला आहे. या करारा अंतर्गत क्रीडा नैपुन्याचा शोध घेऊन त्यांना जर्मन येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याअंतर्गत राज्यात 14 वर्षाखालील मुलांचा एफ.सी.बायर्न महाराष्ट्र कप (14 वर्षाखालील मुले) स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातुन विजयी संघ विभागस्तरावर जाईल व हारलेल्या संघातुन 5 खेळाडू पुढील स्तरावर निवड चाचणी करीता पात्र असेल. 

सदर स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य अशा टप्प्यात होणार असून संपुर्ण राज्यातुन 20 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्याकरीता खेळाडूची जन्मतारीख 01 जानेवारी 2009 नंतर जन्मलेला असावा व जन्मतारखेचा पुरावा म्हणुन आधार कार्ड, बोनाफाईट प्रमाणपत्र, पॅनकार्ड अनिवार्य आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली द्वारे गडचिरोली जिल्ह्याच्या स्पर्धा 11 फेब्रुवारी 2023 ते 12 फेब्रुवारी 2023 या कालावधीत इंदिरा गांधी मेमोरियल हायस्कुल, सुभाषग्राम,ता.चामोर्शी जि. गडचिरोली येथे सकाळी 10.00 वाजेपासून सुरु होईल. सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या इच्छुक शाळा/ संघांनी स्पर्धेकरीताची प्रवेशिका शालेय क्रीडा स्पर्धेप्रमाणे विहित नमुन्यात 01 फेब्रुवारी 2023 ते 07 फेब्रुवारी 2023 या कालावधीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सादर करावी किंवा dsogad2@gmail.com या ई मेल वर प्रवेशिका सादर करावी. 

सदर स्पर्धेकरीता गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त संघांनी सहभागी होण्याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांनी आवाहन केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos