महत्वाच्या बातम्या

 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाकरिता मुदतवाढ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : वर्ग ५ वी मध्ये सत्र २०२२-२३ मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना सुचना आहे. की, सत्र २०२३-२०२४ करिता वर्ग ६ वी मध्ये प्रवेश घेण्याकरिता, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २९ एप्रिल २०२४ ला घेण्यात येणार आहे. त्याकरीता ऑनलाईन प्रवेश परीक्षा अर्ज https://navodaya.gov.in या संकेतस्थळावर भरणे सुरु आहे. प्रवेश अर्ज नोंदणी भरण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२२ होती, त्या तारखेत वाढ करून ऑनलाईन अर्ज नोंदणीची अंतिम तारीख ०८ फेब्रुवारी २०२३ झालेली आहे, याची संबंधित पालकांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे प्राचार्य एम.एन. राव जवाहर नवोदय विद्यालय घोट ता. चामोर्शी, जि. गडचिरोलीच्या व्दारे सुचित करण्यात आले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos