महत्वाच्या बातम्या

 अविकसित भागातील खेळाडूंना संधी देण्यासाठी विदर्भ स्तरीय टूर्नामेंटची आवश्यकता : खासदार अशोक नेते


- चामोर्शी येथे विदर्भ स्तरीय क्रिकेटचे भव्य आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चामोर्शी : शहरांमध्ये क्रिकेट व इतर खेळा करिता फार स्कोप व सुविधा असतात पण गडचिरोली सारख्या अविकसित आदिवासी बहुल नक्षलग्रस्त भागात खेळाडू आहेत मात्र त्यांना संधी उपलब्ध होत नाही. या विदर्भ स्तरीय क्रिकेट टूर्नामेंट मुळे अविकसित भागातील खेळाडूंना आपला खेळ दाखवण्याची संधी मिळणार असल्याने हा स्तुत्य उपक्रम आहे. यासाठी युवकांने मैदानी खेळ खेळावे. खेळामुळे युवकांचे आरोग्य चांगले राहते. खेळ खेळतांना एकाग्रतेने, आनंदाने, हसतमुखाने, खेळ खेळावे. प्रत्येक चमूने आपण जिंकले पाहिजे असा आत्मविश्वास ठेवून खेळ खेळावे. खेळामध्ये यश, अपयश येतात, अपयश आले तरी खचून न जाता, दुसऱ्यांदा जिद्दीने  खेळ खेळून विजय प्राप्त करावे. याकरिता अविकसित भागातील खेळाडूंना संधी देण्यासाठी अशा विदर्भ स्तरीय टूर्नामेंटची आवश्यकता आहे असे मत खासदार अशोक नेते तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा यांनी उदघाटनाच्या सोहळ्या प्रसंगी आपले मत व्यक्त केले. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील संताजी नगर येथे विदर्भ स्तरीय टूर्नामेंटचे उद्घाटन करून ते उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करतांना बोलत होते. या टूर्नामेंटचे प्रास्ताविक भाषण टूर्नामेंटचे आयोजक नगरसेवक व भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा महामंत्री आशिष पिपरे यांनी केले. यावेळी भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश संघटन सरचिटणीस प्रकाश गेडाम यांनीही उपस्थितत्यांना मार्गदर्शन केले. यावेळी खासदार नेते यांनी क्रिकेट खेळून बॅटिंगचा आस्वाद घेत क्रिकेट खेळण्याचा आनंद व्यक्त केला. या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून सौ. सोनाली पिपरे नगरसेविका नगरपंचायत चामोर्शी ह्या होत्या. मंचावर माजी न्यायाधीश सुनील दीक्षित, डॉक्टर नरोटे , युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य स्वप्निल वरगंटे, संदीप पंदीलवार, माणिक कोहडे, अविनाश तालापल्लीवार, आईंचवार, धोडरे , रमेश अधिकारी, आदिवासी आघाडीचे जिल्हा सरचिटणीस रेवनाथ कुसराम, प्रामुख्याने उपस्थित होते. चामोर्शी नगरपालिकेच्या पटांगणातुन भव्या अशी रँली काढण्यात आली होती.





  Print






News - Gadchiroli




Related Photos