महत्वाच्या बातम्या

 पाकिस्तानात नमाजादरम्यान मशिदीत आत्मघातकी हल्ला : २८ जणांचा मृत्यू, १५० जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / पेशावर : पाकिस्तान पुन्हा एकदा एका बॉम्बहल्ल्यामुळे हादरला आहे. पेशावर येथील एका मशिदीत सोमवारी (30 जानेवारी) दुपारी बॉम्बस्फोट झाला. हा ब्लास्ट पेशावर येथील पोलीस लायन्स परिस्थिती मशिदीत जोहर या नमाजादरम्यान झाली होती. मशिदीत स्फोटामुळे (Blast in Mosque) अनेकांचा जीव गेला आहे.

जियो न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, या ब्लास्टमध्ये 28 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 150 हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा आत्मघातकी हल्ला होता. बॉम्बस्फोटात मशिदीचे छत उडाले.

जियो न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात 28 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याचीही माहिती समोर आली आहे. अनेक मृतदेह मशिदीत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या पाकिस्तान आर्मीने परिसर घेरले आहे.





  Print






News - World




Related Photos