महत्वाच्या बातम्या

 यंग चांदा ब्रिगेडच्या शिवनकला प्रशिक्षणातुन महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध : आ. किशोर जोरगेवार


- नि:शुल्क शिवनकला प्रशिक्षण उपक्रमाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन, यंग चांदा ब्रिगेडचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने समाजोपयोगी अनेक उपक्रम राबविल्या जात आहे. यंग चांदा ब्रिगेडची महिला आघाडी उत्तम काम करत असुन महिलांना न्याय देण्यासह त्यांना आर्थिक सक्षम करण्याच्या दिशेनेही महिला आघाडीचे प्रयत्न सुरु आहे. यंग चांदा ब्रिगेडच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने सुरु करण्यात आलेला शिवणकाम प्रशिक्षण उपक्रम कौतुकास्पद आहे. यातुन महिला आत्मनिर्भर बनणार असुन त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार. असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात यंग चांदा ब्रिगेडच्या अल्पसंख्याक विभागाच्या शहर प्रमुख कौसर खान यांच्या वतीने स्वावलंबी नगर येथे नि:शुल्क शिवनकाम प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. नियाज खान, अल्पसंख्याक विभागाच्या शहर प्रमुख कौसर खान, बंगाली समाज शहर प्रमुख सविता दंडारे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, आशु फुलझेले, सायली येरणे, स्मिता वैद्य, अलका मेश्राम, माधुरी निवलकर, नीलिमा वनकर, प्रमिला बावणे, दिक्षा सातपूते, रेशमा पठाण, रुबीना शेख, उजमा शेख, पंकज गुप्ता, राशेद हुसेन, जितेश कुळमेथे, इरशाद शेख, बाबा सातपुते आदींची उपस्थिती होती.  

यावेळी पुढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातुन विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देता यावा, यासाठी संघटनेचे प्रयत्न सुरु आहे. यासोबतच स्वयंरोजगारातुन महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करता यावे, याकरिता संघटना काम करत आहे. ग्रिन रिक्षा या संकल्पनेच्या माध्यमातुन आपण १०० निराधार महिलांना ई रिक्षा उपलब्ध करुन देणार आहोत. याचे नियोजनही आमच्या वतीने केल्या जात आहे. यापुर्वी गरजु महिलांना आपण शिलाई मशिन उपलब्ध करुन दिल्या आहेत. मात्र अनेकांचा शिलाई काम करण्याचा सराव सुटला आहे. तर अनेकांना महागडे शिवनकाम प्रशिक्षण घेणे शक्य नाही. ही बाब लक्षात घेता आपण नि:शुल्क शिवनकाम प्रशिक्षण उपक्रम राबिवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रशिक्षण केंद्रात १०० हुन अधिक महिलांनी नोंदणी केली. हे या उपक्रमाचे यश असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या प्रशिक्षण केंद्रात सध्या १०० महिलांची क्षमता आहे. मात्र ती वाढविण्यात यावी अशा सूचनाही यावेळी बोलतांना आ. जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीला केल्या आहेत. असे उपक्रम शहरात विविध ठिकाणी आयोजित करण्याचे निर्देशही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीला दिले आहे.  

सुरु करण्यात आलेले हे प्रशिक्षण केंद्र २ महिने चालणार आहे. येथे शिलाई, कपडा कापणे, फॅशन डिजाईन आदी प्रकार शिकविण्यात येणार आहे. या प्रशिक्षण केंद्रात सध्या १०० महिलांना प्रशिक्षण दिल्या जात असुन पूढील दोन महिने सदर प्रशिक्षण चालणार आहे. प्रशिक्षण प्राप्त महिलांना शासनाच्या शिलाईकाम संदर्भातल्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने प्रयत्न केल्या जाणार आहे.  





  Print






News - Chandrapur




Related Photos