महत्वाच्या बातम्या

 शिक्षक मतदारांचा उत्साह अन मतदानासाठी रांगा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : विधानपरिषद नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदानाला शांततेत सुरुवात झाली असून मतदानासाठी शिक्षकांचा उत्साह हा शिगेला पोहोचल्याचे आज पहायला मिळाला. आज सकाळपासूनच भंडारा जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर मतदानासाठी रंगा पहायला मिळाल्या.

विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी नागपूर विभागातील एकूण सहा जिल्ह्यांमध्ये १२४ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यात जिल्ह्यातील १२ मतदान केंद्रांवर मतदान होत असून ३ हजार ७९७ शिक्षक मतदानाचा हक्क बजावणार आहे. सकाळी आठ वाजेपासून जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. शिक्षक मतदारांचा उत्साह मतदानासाठी दिसून आला.

मतदानाला सकाळी आठ वाजता सुरुवात झाल्यानंतर शिक्षक मतदार यायला सुरुवात झाली. मतदान कसे करावे, उमदेवारांची माहिती मतदान केंद्रांबाहेर दर्शनी भागात लावण्यात आली होती. प्रत्येक मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त पहायला मिळाला. निवडणुकीत २२ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos