महत्वाच्या बातम्या

 जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांची अपघात ग्रस्ताला आर्थिक मदत


- वेलगुर टोल्या नजीक झाला होता अपघात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील वेलगुर टोल्या नजीकच्या वळणावर झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अपघातातील दोघेही मृतक हे गडचिरोली जिल्हा बाहेरील असल्याने त्यांचे मृतदेह स्वगावी पोहचविण्या करिता जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मदतीचा हात पुढे करत आर्थिक मदत केली. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हे जनमान्यांशी आपली नाळ जुळवून आहेत. आता पर्यंतच्या कालावधीत अनेकांना मदतीचा हात पुढर करत मदत पोहचवली आहे. त्यांच्या या कार्याने नागरिकही प्रशंसा करतांना दिसतात. अहेरी तालुक्यातील वेलगुर टोला नजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. सदर बाब जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कानाशी येताच व मृतक हे गडचिरोली जिल्ह्याच्या बाहेरील असल्याचे लक्षात येताच मृतदेह स्वगृही पोहचवण्या करीता मदतीचा हात पुढे करत आर्थिक मदत केली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos