महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष  


महत्वाच्या घटना (३० जानेवारी)

३० जानेवारी १६४९ : इंग्लंडचे राजा पहिले चार्ल्स यांचा शिरच्छेद करण्यात आला.

३० जानेवारी १९३३ : अ‍ॅडॉल्फ हिटलर यांना जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी झाला.

३० जानेवारी १९४८ : नथुराम गोडसे यांनी मोहनदास करमचंद ऊर्फ महात्मा गांधी यांचा सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी प्रार्थना करीत असताना गोळ्या घालून खून केला.

३० जानेवारी १९९४ : पीटर लेंको बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला.

३० जानेवारी १९९७ : महात्मा गांधीच्या अस्थींचे त्यांचे पणतू तुषार अरूण गांधी यांनी अलाहाबाद येथील संगमात विसर्जन केले. ४७ वर्षे या अस्थी कटकमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये होत्या.

३० जानेवारी १९९९: पण्डित रविशंकर यांना भारतरत्‍न जाहीर.

जन्म (३० जानेवारी)

३० जानेवारी 1882: अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १९४५)

३० जानेवारी १९१० : गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल सी. सुब्रम्हण्यम यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर २०००)

३० जानेवारी १९११ : शास्त्रीय गायक पं. गजाननबुवा जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २८ जून १९८७)

३० जानेवारी १९१७ : स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ वामन दत्तात्रय पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: २७ जुलै २००७)

३० जानेवारी १९२७ : स्वीडनचे २६ वे पंतप्रधान ओलोफ पाल्मे यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९८६)

३० जानेवारी १९२९ : हिंदी, मराठी चित्रपटांतील व रंगभूमीवरील अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक रमेश देव यांचा जन्म.

३० जानेवारी १९४९ : नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते, थिएटर अ‍ॅकॅडमी चे एक संस्थापक, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा चे संचालक, साहित्य अकादमी पारितोषिक विजेते डॉ. सतीश आळेकर यांचा जन्म.

मृत्यू (३० जानेवारी)

३० जानेवारी १९४८ : महात्मा गांधी यांची हत्या. (जन्म: २ ऑक्टोबर १८६९)

३० जानेवारी १९४८ : आपला भाऊ विल्बर राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते ऑर्व्हिल राईट यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १८७१)

३० जानेवारी १९९६ : हार्मोनियम व ऑर्गन वादक गोविंदराव पटवर्धन यांचे निधन.

३० जानेवारी २००० : मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर यांचे निधन.

३० जानेवारी २००४: गीतकार रमेश अणावकर यांचे निधन.





  Print






News - todayspecialdays




Related Photos