महत्वाच्या बातम्या

 माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या प्रयत्नाने वटेली येथील स्व.दलसू सुकरु मडावी यांचे शव घरी पोहोचले


- माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा पुढाकार व आर्थिक मदत करण्यात आले

- आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते तथा माजी आमदार अहेरी विधानसभा क्षेत्र दीपक दादा आत्राम यांचे सहकार्य

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / भामरागड : भामरागड तालुक्यातील वटेली येथील दलसू सुकरु मडावी वय ६१ वर्ष होते. वयोवृद्ध असल्यामुळे त्यांची तब्बेत बिगळली असता, लगेच त्यांचा मुलगा सोनू मडावी याने १०८ नं. गाळीला बोलावून लगेच अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरानी दलसू ला मृत घोषीत केले. मात्र घरची परिस्थिती हलाखीचे असल्याने अडचण निर्माण झाली होती. सदर बाब आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते तथा जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांना माहिती होताच अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित होऊन मय्यत व्यक्ती नामे दलसू सुकरु मडावी यांना स्वगृही सोडण्यासाठी अहेरी नागरपंचयातची वैकुंठरथ बोलावून त्यांना भामरागड तालुक्यातील वटेली येथे पाठविण्यात आले, व त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्यात आली. 

यावेळी उपस्थित नगरपंचायत अहेरीचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, विनोद रामटेके, नरेंद्र गर्गम, प्रकाश दुर्गे, यांनी रुग्णालयात जावून भेट घेवुन सहकार्य केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos