बेरोजगारांना नौकरीचे आमिष दाखवून लुबाडणाऱ्या कृषी सेवकास चिमूर पोलीसांनी ठोकल्या बेड्या


- ८ बेरोजगारांची ३६ लाख ५७ हजार रुपयांची फसवणूक 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चिमूर :
तालुक्यातील कृषी विभागाअंतर्गत शंकरपूर कृषी मंडळ कार्यालयात कृषी साहाय्यक पदावर असलेला आरोपी अनुप सकरू पवार रा. घाटंजी जि. यवतमाळ याने अनेकांना शासकीय नौकरीचे आमिष दाखवून  अंदाजे ३६ लाख ५७ हजार रुपयांची माया गोळा केली.  याबाबत चिमूर पोलीस ठाण्यात तक्रार प्राप्त होतास कसून चौकशी केली असता लुबाडनुक केल्याचे तपासात निष्पन्न झाले.  सदर आरोपी विरुद्ध कलम भादवी ४२० , ४६ ८, ४७१, ३४ गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकण्यात आले आहेत . 
 मुळचा यवतमाळ जिल्हातील घाटंजी येथील रहीवासी असलेला आरोपी अनूप सखरू पवार हा चिमूर येथील कृषी विभागात कृषी सेवक पदावर २ ऑगस्ट १८ रोजी रुजू झाला . दरम्यान वडाळा ( पैकु ) चिमूर येथे वास्तव्य करीत असतांना परिसरातील अनेक बेरोजगार युवकांसोबत मैत्री करून मि नौकरी लावून देतो असे खोटे आमिष दाखवून चिमूर येथील पाच युवकांना लाखो रुपयांने गंडविले. आरोपीचा प्रताप इतपर्यतच न राहता हिगंणघाट, भद्रावती, आदी गावातील युवकांची खोटा लेखी व बनावटी नियुक्ती आदेश देवून फसवणुक केली.
 सदर आरोपी विरुद्ध कलम भादवी ४२० , ४६ ८, ४७१, ३४ गुन्हा दाखल करून चिमूर पोलीसांनी कसून तपास केला असता आता पर्यत आठ लोकांची फसवणूक करून ३६ लाख ५७ हजार रूपयांची लुबाडनुक केल्यांची तपासात उघड झाली. चिमूर पोलीसांनी आरोपीला सोमवार ला चिमूर न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सदर प्रकरणात मोठे स्कॅन्डल असल्याची शक्यता वर्तविल्या जात असुन पुन्हा या प्रकरणात आरोपीची संख्या वाढनार असल्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. सदर घटनेचा तपास ठानेदार प्रमोद मडामे यांच्या  मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगोले करीत आहे.
   Print


News - Chandrapur | Posted : 2018-11-06


Related Photos